बेंगळूर/प्रतिनिधी
१९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी पी. रविंद्रनाथ यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला. अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. रवींद्रनाथ यांनी गेल्या बारा वर्षांत तिसऱ्यांदा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्याच बॅचच्या एका अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीच्या एक दिवस आधी पदोन्नती दिल्याने आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ नाराज होऊन आणि पदोन्नतीच्या विरोधात राजीनामा दिला आहे.
रवींद्रनाथ यांनी सुनील कुमार माझ्या बॅचचे आहेत. सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी त्याची पदोन्नती बेकायदेशीर आहे. याचा निषेध म्हणून मी राजीनामा दिला आहे. तसेच पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी चर्चेसाठी बोलविले आहे असे त्यांनी सांगितले.