प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज गुरुवारी 188 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 116 पुरुष, 72 स्त्रियांचा समावेश आहे. आज 5 तर आतापर्यंत 906 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 30 हजार 429 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 2 हजार 863 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2810 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2622 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 188 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 906 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 26 हजार 660 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1073
मंगळवेढा- 1394
बार्शी – 5442
माढा- 3143
माळशिरस – 5290
मोहोळ- 1448
उत्तर सोलापूर – 726
करमाळा- 2026
सांगोला – 2418
पंढरपूर 6055
दक्षिण सोलापूर – 1414
एकूण – 30, 429
होम क्वांरटाईन – 4188
एकूण तपासणी व्यक्ती- 239157
प्राप्त अहवाल- 239108
प्रलंबित अहवाल- 49
एकूण निगेटिव्ह – 208680
कोरोनाबाधितांची संख्या- 30,429
रुग्णालयात दाखल – 2863
आतापर्यंत बरे – 26, 660
मृत – 906
– एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 30,429 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती
2863 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार