बेंगळूर/प्रतिनिधी
बृह बेंगळूर महानगरपालिका (बीबीएमपी) विभागात कोरोना मृत्यू दर ०.९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी आहे.
कोविड वॉर रूमचे कार्यवाहक झोनल अधिकारी मुनीश यांनी, मृत्यू दर आणखी कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न चालू असून सकारात्मकतेचा दर जुलैमध्ये २३ टक्क्यांवरून आता १० टक्क्यांवर आला असल्याचे म्हंटले आहे.
कोविड रूग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांची संख्या जुलैच्या तुलनेत १० पट वाढली आहे. जुलैमध्ये दररोज चार हजार कोविड चाचण्यांच्या तुलनेत आता जिल्ह्यात सुमारे २५ हजार चाचण्या केल्या जात आहेत.