बेंगळूर//प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक कमी जास्त होताना पहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाने चार लाख रुग्णांचा टप्पा ओलांडलेला आहे. तर तीन लाखाहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान राज्यामध्ये बेंगळूर शहरी जिल्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
बुधवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३,४१९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. अतापर्यंत एकूण १,५७,०४४ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी ४२,२०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १,१२,५३६ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे एकूण २,३०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी १,५६४ रूग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.