बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रांच पोलिसांनी गुरुवारी शहरात ३० लाख किमतीचे एलएसडी आणि एक्स्टसी ड्रग्ज जप्त केले असून ११ जणांना अटक केली आहे.
दरम्यान, सीसीबीचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपींकडून मिथाइल एन्डीओक्सी मेथाम्फॅटामिन (एमडीएमए), एक्स्टसी, लायझरिक अॅसिड डायथॅलामाइड (एलएसडी) ड्रग्ज आणि मोबाइल फोन जप्त केले आहेत.
बयान अन्सारी (वय २६) , अर्नाल्ड पास्कल डसूझा (वय २७ ), अनिरुद्ध वेंकटाचलम, कनिष्क रेड्डी (वय २३) , संतोष के. (वय २८) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व बेंगळूर येथील रहिवासी आहेत.