बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचाराच्या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणाची सूत्रे एनआयएने हाती घेतल्यानांतर गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी केजी हळ्ळी पोलीस ठाण्यावरील हल्ल्यात भाग घेतल्याप्रकरणी एका मुख्य सूत्रधारला अटक केली आहे.
मंगळवारी तपास हाती घेतल्यापासून एनआयएच्या पथकाने शहरात तळ ठोकला आहे. त्यानुसार त्यांनी ४४ वर्षीय सय्यद सद्दीक अली याला शहरातून अटक केली. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा बँकेत रिकव्हरी एजंट म्हणून काम करतो आणि दंगलीनंतर ११ ऑगस्टपासून फरार होता.
केजी हळ्ळी आणि डीजे हळ्ळी पोलीस ठाण्यांवरील हल्ल्यामागील कथित कट रचण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यासाठी या पथकाने शहरातील ३०ठिकाणी शोध घेतला. शोध दरम्यान एअरगन, गोळ्या, धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड, डिजिटल उपकरणे, डीव्हीआर (डायनॅमिक व्हिजन रिसोर्सेस) आणि एसडीपीआय (सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया) आणि पीएफआय (पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया) शी संबंधित अनेक गुन्हेगारी कागदपत्रे आणि साहित्य सापडले आहे. ते सर्व साहित्य एनआयए कडून जप्त केलं असल्याचे सांगितले आहे.