बेंगळूर/प्रतिनिधी
निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीकांत डी. बबालादी यांच्या अध्यक्षतेखाली सिटीझन फॉर डेमॉक्रसीच्या सत्य-शोध समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना नुकत्याच झालेल्या बेंगळूर हिंसाचाराचा अहवाल सादर केला.
ऑगस्टमध्ये बेंगळूर येथील केजी हळ्ळी आणि डीजे हळ्ळी येथे हिंसाचाराची घटना घडली होती. यामध्ये पोलीस स्टेशन आणि एका आमदाराच्या घरावर हल्ला करत जाळपोळ करण्यात आली होती. याविषयी समितीने गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला आहे.