बेंगळूर/ प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचार प्रकरणी बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी मंगळवारी बेंगळूरमधील तीन सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) कार्यालयात शोध घेतला.
सीसीबीने दिलेल्या माहितीनीसार बेंगळूर हिंसाचाराच्या संदर्भात पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी, डीजे हळ्ळी व केजी हळ्ळी प्रकरणात आम्ही कोर्टाकडून सर्च वॉरंट घेतले आणि सीसीबीच्या तीन पथकांनी डीजे हळ्ळी, केजी हळ्ळी येथील तीन एसडीपीआय कार्यालयात शोध घेतला असल्याची माहिती दिली आहे.