ऑनलाईन टीम / लडाख :
पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरातील नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याची घुसखोरी रोखल्यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला आहे. सीमारेषेवर दोन्ही देशांनी युद्धसज्जता ठेवली आहे.
भारतापासून जवळच्या अंतरावर चीनने जड आणि हलक्या वजनाचे रणगाडे तैनात केले आहेत. तसेच नियंत्रणरेषेवर दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांवर तोफगोळ्यांचा मारा करू शकतील, अशा स्थितीत सज्ज आहेत. चीनने कालाटोप परिसरात डोंगराच्या पायथ्याला रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने तैनात केली आहेत.
भारतानेही काळाटोप परिसरात युद्धसज्जता ठेवली आहे. सैन्य आणि रणगाड्यांची संख्या वाढवली आहे. काळाटोप परिसर भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात आहे.