सत्तरी, डिचोली तालुक्यातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर चिरेखाणीच्या व्यवसायाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण सरकारने अवलंबिवली आहे. अनेक व्यावसायिकांना कोटय़वधी रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. सध्यातरी बेकायदेशीर चिरेखाणीचा व्यवसाय बंद आहे ?मात्र काही ठिकाणी रात्री हा व्यवसाय सुरू करण्यात येत असल्याची माहिती स्थानिकांकडून उपलब्ध झाली असून स्थानिक तलाठी यांचा हात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
खाण व भूगर्वसंचनालयाने बेकायदेशीर चिरेखाणीच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात मोहीम उघडलेली आहे. काही समाजसेवी नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर खाण व भूगर्भ संचालनालय जागे झाले असून त्यांनी आता बेकायदेशीर चिरेखाणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेल्यावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे.
गेल्या जवळपास पंधरा वर्षापासून गुळेली, भिंरोडा, होंडा, पिसुर्ले, नगरगाव, खोतोडा मोर्ले, पर्ये या भागांमध्ये चिरेखाणीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणी सरकारी मालकीच्या जमिनीमध्ये चिरे उत्खनन सुरू होते. अधिकाऱयांचे कृपाछत्रामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती.
खाण व भूगर्भ संचालनालयाने गुगलच्या माध्यमातून सर्वेक्षण केलेले आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीर चिरेखणींचा व्यवसाय झालेला आहे तेथील परिसर उध्वस्त झाले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने उत्खनन करण्यात आलेले आहे त्यानुसार दंडाची वसुली करण्यात येणार आहे. काही व्यावसायिकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर ही दंडाची वसुली करण्याचे धोरण अवलंबित येणार आहे. येणाऱया 15 दिवसांमध्ये कारवाईचे सत्र प्रत्यक्षपणे सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.