बेळगाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, वार्ता विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, कुष्ठरोग नियंत्रण विभाग, तालुका पंचायत व बेकिनकेरे ग्रा. पंचायतीच्यावतीने कुष्ठरोग जागृती अभियान कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झाला. प्रारंभी शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रार्थना गीत सादर केले. जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉ. चांदणी देवडी यांनी प्रास्ताविक करून जागृती अभियानाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी, ग्रा. पं. पीडीओ स्मिता चंदरगी, उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्मिता गोडसे, ग्रा. पं. उपाध्यक्षा गंगूबाई गावडे, क्षेत्र आरोग्य शिक्षणाधिकारी बी. पी. यलीगारसह ग्रा. पं. सदस्य बळवंत भोगण, राजू सावंत, भावकू सावंत आशा कार्यकर्त्या राधा मोरे, मालू भातकांडे, शांता सुतार, माया पाटील व मोठय़ा प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.