अथणी पोलिसांची धडक कारवाई : जिल्हा पोलीस प्रमुखांकडून अभिनंदन
वार्ताहर / अथणी
संकोनहट्टी येथे घराबाहेर खेळणाऱया 2 वर्षांच्या बालकाचे अज्ञातांनी अपहरण केले होते. याची माहिती मिळताच अथणी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कुमार हडकर यांनी तत्काळ आपल्या सहकाऱयांसमवेत तपासाची चपे फिरवित पाच आरोपींसह गुह्यात वापरलेली दोन वाहने ताब्यात घेतली. अथणी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
चन्नाप्पा जिनाप्पा बहुरुपी (वय 2) या बालकाचे संशयित जोतिबा सिद्धलिंग भंगी (रा. अथणी), जंबूसागर आप्पाण्णा नाडगौड (रा. औरखोड), कुमार अर्जुन हिरेमणी (रा. देवरडेरहट्टी), प्रशांत ऊर्फ परसाप्पा केदारी बडखंबी (रा. अथणी) व अनिल रामू बडखंबी (रा. अथणी) यांनी अपहरण केले होते. अपहरणाची माहिती मिळताच अथणी पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. अथणीतील एका कुटुंबास सदर बालक 4 लाखांना विकण्याच्या उद्देशाने पाच जणांनी त्याचे अपहरण केले होते. यापैकी 2 लाख रुपयांची त्यांनी आगाऊ उचल केली होती. ती रक्कमही पोलिसांनी संशयितांकडून जप्त
केली. उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश, सीपीआय शंकरगौडा बसगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली अथणीचे फौजदार कुमार हडकर, कागवाडचे फौजदार हणमंत धर्मट्टी, ऐगळीचे फौजदार शिवराज नाईकवाडी, ए. ए. इरकर, पी. बी. नायक, पी. एन. कुरी, बी. वाय. मनोवार, जी. एच. होनवाड, आर. सी. हादीमनी, के. बी. शिरगुर, शिवकुमार दोडमनी, रेणुका मादर, संजू मुळ्यागोळ आदींनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.