वेंगुर्ले/ प्रतिनिधी-
बेनामी ठेकेदारी बंद केल्याने आडेली ग्रा. पं. सदस्य तात्या कोंडसकर आणि समिर कुडाळकर हे आकांडतांडव करीत असून ग्रा. पं. च्या विरोधात उपोषणाचा फार्स करीत असल्याचा आरोप आडेली ग्रा. पं. चे प्रभारी सरपंच संतोष कासले यांनी केला आहे.
कासले म्हणाले कोंडसकर हे गेली आठ वषेँ सदस्य आहेत. आडेली ग्रा. पं. ची छोटी मोठी कामे बेनामी ठेकेदारीने ते करीत. मी सरपंच झाल्यानंतर ही बेनामी ठेकेदारी बंद केली. त्यामुळे तसेच सध्या आमदार दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून गावात विकास कामे होत आहेत. आपण विकास कामे आणू शकत नाही हे शल्य या दोघाना वाटते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका त जनता आपल्या बरोबर राहाणार नाही या भितीने जनतेच्या डोळयात धूळफेक करुन संशय निर्माण करण्यासाठी ग्रा. पं. च्या विरोधात उपोषण वगैरे नाटके त्यांनी चालू केली आहेत. त्यामुळे या दोघांनी ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी जनता सुज्ञ आहे.