प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिका क्षेत्रातून गोळा होणाऱया सुक्मया कचऱयावर सोनसडा यार्डात तसेच मडगाव पालिका इमारतीच्या मागील जागेत बेलिंग करण्यात येत असून सदर कचरा कर्नाटकमधील सिमेंट कारखान्याला पाठवून देणे लॉकडाऊनमुळे शक्मय होत नसल्याने हा बेलिंग केलेला कचरा येणाऱया मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालिकेसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.
कर्नाटकातील सिमेंट कारखान्याला कंत्राटदारामार्फत हा बेलिंग केलेला सुका कचरा पाठविला जात होता. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सीमेवरून वाहने सोडण्यावर निर्बंध घातले गेल्याने कंत्राटदाराने कचऱयाची उचल केली नसल्याची माहिती पालिकेच्या सोनसडय़ावर देखरेख ठेवणाऱया तांत्रिक विभागाच्या एका अभियंत्याने दिली. सोनसडय़ावर बेलिंग करण्यात आलेल्या सुक्मया कचऱयाचे ब्लॉक्स ठेवण्यासाठी जागा कमी पडू लागल्याने यार्डातील रस्त्याच्या बाजूला रांगेत असे बेलिंग ब्लॉक्स ठेवण्याची पाळी आहे.
सुक्या कचऱयाचे प्रमाण परत वाढले
दैनंदिन सुमारे 15 टन कचरा मडगाव पालिका क्षेत्रातून गोळा होत असतो. सोनसडय़ावर तसेच पालिका इमारतीमागील पार्किंग प्रकल्पाच्या जागेत या सुक्मया कचऱयावर बेलिंग करण्यात येते. पहिल्या दोन लॉकडाऊनच्या काळात नियम काटेकोर असल्याने आस्थापने बंद राहिल्याने सुका कचरा गोळा होण्याचे प्रमाण सुमारे 70 टक्के घटले होते. मात्र तिसऱया लॉकडाऊनमध्ये राज्यातील निर्बंध शिथील करण्यात आल्याने परत सुक्मया कचऱयाचे प्रमाण वाढले आहे.
दुसरा सोनसडा निर्माण होण्याची भीती
बेलिंग केलेला कचरा उचलला जात नसल्याने तसेच बेलिंग करण्याचा कचरा पडून असल्याने पावसाळय़ापूर्वी या कचऱयाची उचल न झाल्यास विपरित परिणाम होऊन मडगाव पालिकेमागील शहरी भाग दुसरा सोनसडा बनण्याची भीती स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक यांनी नुकत्याच पार पडलेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत व्यक्त केली होती. या कचऱयावर प्लास्टिकचे आवरण घालण्याची मागणी त्यांनी उचलून धरली असता यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते.