प्रतिनिधी/ मडगाव
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन कचरा उचल करणाऱया कामगारांकडे योद्धाच म्हणून पाहिले जाते. संसर्गाचा धोका पत्करून काम करत असल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. मात्र मडगाव पालिका क्षेत्रातील कचरा उचल करणाऱया अशा रोजंदारीवरील कामगारांना अजूनही एप्रिल महिन्याचे वेतन मिळालेले नसून सोमवारपर्यंत ते न मिळ?ाल्यास कचरा उचल बंद करण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.
शुक्रवारपर्यंत वेतन बँकेत जमा न झाल्याने या रोजंदारीवरील कामगारांनी काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र नगराध्यक्षा पूजा नाईक यांच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या कामगारांची समजूत काढून सोमवारी वेतन बँकेत जमा करण्याचे आश्वासन दिल्यावर हे कामगार कामावर रजू झाले होते.
मुख्याधिकारी रजेवर, सही बाकी
मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी आजारी असल्यास्तव रजा घेतली असून त्यांची सही राहून गेल्याने वेतन बँकेत जमा करण्यास विलंब झाल्याचे आपल्या नजरेस आणून देण्यात आले आहे. सोमवारी मुख्याधिकारी कामावर रूजू होणार असून त्याचदिवशी या रोजंदारीवरील कामगारांना वेतन मिळेल याची आपण काळजी घेणार असल्याचे नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मागील वेळी सहीविना फेडले होते वेतन
मागील वेळी वेतन देणे सहीमुळे शक्मय झाले नव्हते तेव्हा बँकेतील अधिकाऱयांना सांगून वेतन फेडण्यात आले होते. शुक्रवारी आपण बँक अधिकाऱयांशी संपर्क साधला. मात्र मागील वेळी ‘कोविड’मुळे सहीविना वेतन दिले असले, तरी आता शक्मय नसल्याचे सांगण्यात आले आहे. कारण पालिकेच्या अधिकाऱयांनी बँकेच्या अधिकाऱयांना असे प्रकार पुढे झाल्यास पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला होता असे आपणास सांगण्यात आले आहे, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षांनी काढली समजूत
सध्या मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी गौरीश संखवाळकर यांच्याकडे मडगाव पालिकेचा ताबा आहे. त्यांची सही घेऊन वेतन देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याने सोमवारपर्यंत कळ सोसण्याची विनंती करून आपण रोजंदारीवरील कामगारांची समजूत काढल्याची माहिती नाईक यांनी दिली.
कॅशरकडून सही घेण्यास विलंब : राणे
दरम्यान, वेतन देण्यास विलंब का झाला अशी विचारणा लेखा व कर अधिकारी अभय राणे यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, रोजंदारीवरील कामगारांचे वेतन दर महिन्याला 13 रोजी बँकेत जमा होत असते. आपण व प्रशासकीय अधिकाऱयाने वेतनाच्या फाईलवर सही केली होती. नंतर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांची सही घेण्याचे काम कॅशरचे असून त्यांनी विलंब केल्याने तसेच मुख्याधिकारी रजेवर गेल्याने वेतन वेळेवर बँकेत जमा करणे शक्मय झाले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.