प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मच्छे विभागाच्यावतीने मच्छे ते रायगडपर्यंत सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मच्छे, वाघवडे, हलगा व धामणे गावांतील धारकरी सहभागी झाले होते. धारकऱयांनी रायगडपर्यंतचा सायकल प्रवास करूत तेथे दीपोत्सव साजरा केला.
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाने 32 मण सुवर्णसिंहासन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सायकलवरून जागृती करत हा प्रवास करण्यात आला. रायगडावर नयनरम्य असा दीपोत्सव करण्यात आला.
सचिन चोपडे, किशोर लाड, नागराज लाड, बबितेश सुळगेकर, हरिष पाटील, रवी मुसळे, रोहित यळ्ळूरकर, अमोल बेळगुंदकर, अमित कणबरकर, प्रवीण पाटील, महेश मोरे, कल्लाप्पा जायाण्णाचे यासह धारकरी उपस्थित होते.