केएसआरटीसी कर्मचाऱयांचे आंदोलन दुसरा दिवस, डोक्यावर चप्पल ठेवत दुसऱया दिवशीच्या आंदोलनाला सुरूवात
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावात केएसआरटीसी कर्मचाऱयांचे आंदोलन सलग दुसऱया दिवशीही सुरूच आहे. केएसआरटीसी कर्मचाऱयांची मागणी अद्यापही पूर्ण झाली नसून त्यावर योग्य तोडगा न निघाल्याने आज शनिवारीही बससेवा ठप्प आहे.
परिवहनचे कर्मचारी आक्रमक होऊन आंदोलन करताना दिसत आहेत. शनिवारी डोक्यावर चप्पल ठेऊन घोषणा देत आंदोलनाला सुरूवात झाली. राज्य सरकार आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत कर्मचाऱयांनी नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी रात्रभर हे आंदोलन सुरूच होते. केएसआरटीसी कर्मचाऱयांच्या या आंदोलनाला काही शेतकऱयांनीही पाठिंबा दिला आहे.