प्रतिनिधी/बेळगाव
गेल्या 24 तासात बेळगाव शहर व जिल्हय़ातील 3 हजार 400 हून अधिक जणांचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून रविवारी 28 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्हय़ात 213 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार सुरूच आहे. शनिवारी रात्रीपर्यंत प्रशासनाला 9 हजार 380 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा होती. रविवारी हा आकडा 5 हजार 911 आहे. यावरून जिल्हय़ातील 3 हजार 469 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 3 लाख 45 हजार 443 जणांची स्वॅब तपासणी झाली असून त्यापैकी 3 लाख 11 हजार 563 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.