मात्र प्रवाशांचा प्रतिसाद आवश्यक
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे बंद असणारी रेल्वेसेवा पुन्हा सुरू होणार आहे. रेल्वेविभागाने प्रवाशांच्या सोयीखातर दोन विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूर ते बेळगाव व बेंगळूर ते म्हैसूर या मार्गावर विशेष रेल्वे धावणार आहेत. या रेल्वेचे बुकिंग पूर्णपणे ऑनलाईन असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ही विशेष एक्सप्रेस रेल्वे आठवडय़ातून 3 वेळा बेळगावकडे तर 3 वेळा बेंगळूरकडे धावणार आहे. प्रवाशांमधून करणाऱया येणाऱया बुकिंग नंतर तारीख ठरविण्यात येणार आहे. बुकिंग पूर्णता ऑनलाईन असून रेल्वेच्या आयआरसीटीसी च्या वेबसाईडवर जावून बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरी रेल्वे ही बेंगळूर ते म्हैसूर या दरम्यान धावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.