प्रतिनिधी /बेळगाव :
बेळगाव जिल्हय़ात गुरुवारी 259 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका बेळगाव शहरासह तालुक्मयात 134 जणांना कोरोनाची लागण झाली असून जिल्हय़ातील 10 जणांचा बळी गेला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 50 जणांना गुरुवारी घरी पाठविण्यात आले आहे. बिम्समधील दोन डॉक्टरांसह एकूण तीन डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयात गुरुवारी 134 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 30 जण तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावातील आहेत तर 104 जण शहर व उपनगरांतील आहेत. आरोग्य विभागातील वरि÷ अधिकाऱयांनी ही माहिती दिली असून गोकाक तालुक्मयातील 30, बैलहोंगल तालुक्मयातील 26, अथणी तालुक्मयातील 17, हुक्केरी, सौंदत्ती, रामदुर्ग, रायबाग, खानापूर तालुक्मयातही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बेळगाव शहरातील महांतेशनगर, गणेशनगर-हिंडलगा, गोंधळी गल्ली, दरबार गल्ली, श्रीनगर, अनगोळ, शहापूर, खासबाग, खडेबाजार, उज्ज्वलनगर, वीरभद्रनगर, रुक्मिणीनगर, वडगाव, येळ्ळूर, नेहरूनगर, शाहूनगर, न्यू गांधीनगर, आझादनगर, वंटमुरी कॉलनी, कपिलेश्वर रोड, अमननगर, गुरुप्रसाद कॉलनी, कोल्हापूर सर्कल, न्यू वैभवनगर, कोतवाल गल्ली, भोई गल्ली, टिळकवाडी, नानावाडी, शिवबसवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बिम्समध्ये सेवा बजावणारे दोन डॉक्टर, खासगी इस्पितळातील एक डॉक्टर, बैलहोंगल सरकारी इस्पितळात सेवा बजाविणारी महिला कर्मचारी, बेळगाव येथील खासगी इस्पितळात काम करणारे दोन कर्मचारी, बैलहोंगल तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारी, सांबरा एअरफोर्समधील दोघे जण व मच्छे येथील राज्य राखीव दलाचे 9 पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
रामदुर्ग येथे परिवहन मंडळात सेवा बजाविणाऱया दोन कर्मचाऱयांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खासकरून सरकारी व खासगी इस्पितळात सेवा बजाविणारे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या 8 ते 10 दिवसात बेळगाव शहर व जिल्हय़ातील रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असून जिल्हय़ाने तीन हजारांचा आकडा पार केला आहे.
गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 50 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 806 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1950 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. बेळगाव, अथणी, गोकाक, रायबाग तालुक्मयातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये मात्र चार मृत्यूंचा उल्लेख आहे.
प्रशासनाला आणखी 400 अहवालांची प्रतीक्षा आहे. तर 7 हजार 522 जण 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत. स्वॅब तपासणी वाढविण्यात आली आहे.
जिल्हय़ाची वाटचाल पाच हजाराकडे
बेळगाव जिल्हय़ाची वाटचाल पाच हजार रुग्णसंख्येच्या दिशेने सुरू आहे. कारण होम क्वारंटाईनमधील संशयितांची संख्या अधिक आहे. ज्यांच्यात लक्षणे दिसून येतात त्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे साहजिकच रुग्णसंख्या वाढती आहे.