प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव व तालुक्मयाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अंदाजे 10 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या या तालुक्मयात केवळ एक अग्निशमन केंद्र आहे. शहराच्या उत्तर विभागात आणखी एक केंद्र असावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र अग्निशमन विभागाने बेळगाव महानगर पालिकेकडे पाठविले होते. परंतु हा प्रस्ताव अद्याप धूळखात पडला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेंगळूर येथे बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीनंतर अग्निशमन केंद्राची प्रशासनाला आठवण झाली. बेळगावमध्येही आता 12 ते 13 मजली इमारती उभ्या राहत आहेत. शहर व तालुक्मयाची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. शहराच्या हद्दीत उद्यमबाग, ऑटोनगर तर तालुक्मयाच्या हद्दीत नावगे, मच्छे, वाघवडे, काकती, होनगा या औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे आगीचा धोका सर्वाधिक असल्याने अजून एका अग्मिशमन केंद्राची आवश्यकता भासत आहे.
शहराच्या उत्तर विभागात हवे अग्निशमन केंद्र
बेळगाव शहराची व्याप्ती वाढत असून गोवावेस येथील अग्निशमन केंद्र शहराच्या एका बाजूला झाले आहे. शहराच्या उत्तर भागात लोकवस्ती वाढली आहे. याचसोबत ऑटोनगर व कणबर्गी येथे औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग सुरू होत आहेत. काही वर्षांपूर्वी ऑटोनगर येथील एका कारखान्याला भीषण आग लागली होती. त्यामुळे शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्रासाठी जागा द्यावी, असे पत्र तत्कालिन जिल्हा अग्निशमन अधिकारी स्वामी यांनी महानगरपालिकेला पाठविले होते. परंतु अद्याप हा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. काही काळाकरिता पोलीस आयुक्त कार्यालयाच्या शेजारी अग्निशमन बंब उभा करण्यात आला होता. परंतु त्या ठिकाणी अग्निशमन जवानांची गैरसोय होत असल्याने ते देखील बंद करण्यात आले.
बेळगाववरच अन्याय का?
हुक्केरी तालुक्मयात हत्तरगी, संकेश्वर व हुक्मकेरी अशी 3 अग्निशमन केंद्रे आहेत. चिकोडी तालुक्मयात सदलगा, निपाणी व चिकोडी अशी 3 अग्निशमन केंदे आहेत. मोठी औद्योगिक वसाहत किंवा लोकसंख्या नसतानाही तालुक्मयात 3-3 उपकेंद्रे आहेत. शेजारील हुबळी-धारवाड शहरात 4 अग्निशमन केंदे आहेत. मग बेळगाव शहर व तालुक्मयावरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
असे आहे बेळगावचे अग्निशमन केंद्र
गोवावेस येथे बेळगाव शहर व तालुक्मयाचे अग्निशमन केंद्र आहे. एकूण 50 अग्निशमन अधिकारी, 50 एसडीआरएफचे जवान व 50 निवृत्त जवानांची फौज आहे. दोन शिफ्टमध्ये या जवानांचे काम चालते. 4 मोठे वॉटर टँकर, 1 रेक्यू व्हॅन, 1 क्वीक रिस्पॉर्न्स व्हेईकल अशी वाहने अग्निशमनकडे आहेत.
अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक वाहने : व्ही. एस. टक्केकर
अग्निशमन विभागाकडे अत्याधुनिक वाहने आहेत. तसेच कर्मचाऱयांची संख्याही मुबलक आहे. परंतु शहराची व्याप्ती वाढत असल्याने उपनगरांपर्यंत काही क्षणात पोहोचणे अशक्मय होते. त्यामुळे शहराच्या उत्तर भागात अग्निशमन केंद्र झाल्यास नागरिकांसोबतच आपत्ती निवारणासाठी सोयीचे होणार असल्याचे ठाणा अधिकारी-बेळगाव अग्निशमन केंद्राचे ठाणा अधिकारी व्ही. एस. टक्केकर यांनी सांगितले.