प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-शेडबाळ (रेल्वे क्र. 07335-07336) ही स्पेशल रेल्वे दुरुस्तीच्या कारणास्तव 12 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बेळगाव येथील यार्डमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी दिली आहे.
हुबळी मिरज या मार्गावर अद्याप पॅसेंजर सुरू करण्यात आलेली नाही. एकमेव धावणारी बेळगाव शेडबाळ ही स्पेशल रेल्वे देखील आता काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे बंद राहणार असल्याने कुडची, रायबाग, घटप्रभा, गोकाक येथील प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागणार आहे.