परिवहनकडून विशेष बससेवा : देवीच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
प्रशासनाने मंदिरे भक्तांना खुली केल्याने भाविकांची संख्या वाढली आहे. सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या वाढली आहे. भक्तांच्या सोयीसाठी परिवहनने विशेष बससेवा सुरू केली आहे. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बेळगाव-सौंदत्ती बस फुल होताना दिसत आहे.
मागील महिन्यात पौर्णिमेदरम्यान सौंदत्ती यल्लमा यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे भक्तांना दर्शनापासून दूर रहावे लागले होते. मात्र आता मंदिरे खुली करण्यात आल्याने भक्तांचा ओढा वाढला आहे. शिवाय सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱया भक्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिवहनने बेळगाव-सौंदत्ती मार्गावर बसफेऱया वाढविल्या आहेत. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज सौंदत्तीला दहा बस धावत आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बस मार्गस्थ होत आहेत.
दरवषी सौंदत्ती यल्लम्मा यात्रेतून परिवहनला 20 लाखांहून अधिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा यात्रेदरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने परिवहनला आर्थिक फटका बसला. मात्र आता मंदिर खुले झाल्यानंतर सौंदत्तीला जाणाऱया भक्तांची संख्या वाढली. भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जादा बस सोडल्या आहेत. या बसनादेखील प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.
बेळगावसह कोल्हापूर जिल्हय़ातील चंदगड, कोवाड, नेसरी परिसरातील भाविकांची सौंदत्तीला ये-जा वाढली आहे. दरम्यान, महाराष्ट्र बससेवा संपामुळे ठप्प असल्याने भक्तांचा प्रवास कर्नाटक परिवहनच्या बसने सुरू आहे. त्यामुळे कर्नाटक बसला प्रवासी संख्या जादा दिसून येत आहेत.