केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ब संघाने युनियन जिमखाना संघाचा 88 धावाने पराभव करून 4 गुण मिळविले. 99 धावा व 3 गडी बाद करणाऱया अष्टपैलू विजय पाटीलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए मैदानावर बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने 46.3 षटकात सर्व बाद 253 धावा केल्या. कर्णधार विजय पाटीलने 6 षटकार, 6 चौकारासह 99, तनिष्क नाईकने 54, सोमनाथ सोमनाचेने 26, आकाश असलकर व अमित यादव यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. जिमखानातर्फे पुरूषोत्तम जकबलने 30 धावात 3, श्रेयस मातीवड्डरने 1 धावात 2, ऋषीकेश रजपूतने 19 धावात 2, अमेय भातकांडेने 48 धावात 2 तर दीपक राक्षेने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाचा डाव 36.4 षटकात 165 धावात आटोपला. विनीत अडुरकरने 1 षटकार, 5 चौकारासह 41, दीपक राक्षेने 1 षटकार, 5 चौकारासह 32, शिवानंद पाटीलने 29, प्रवीण हिरेमठने 23, सर्फराज मुल्लाने 10 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब तर्फे विजयकुमार पाटीलने 25 धावात 3, आकाश असलकरने 45 धावात 3, अमित यादवने 13 धावात 2, रोहित ढवळे व किरण बोकडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.