क्रीडाभारती क्रीडा स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर क्रीडाभारती बेळगाव जिल्हा आयोजित क्रीडा स्पर्धेत पिरनवाडी, चंदरगी स्पोर्ट्स स्कूल, बालिका आदर्श, मोरारजी देसाई स्कूल, सरकारी हायस्कूल काद्रोळी संघांनी विजेतेपद पटकाविले,
अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : माध्यमिक मुले खो खाs-1) चंदरगी स्पोर्ट्स स्कूल, 2) शिवाजी हायस्कूल कडोली. उत्कृष्ट रनर व्यंकटेश बुट्टण्णावर, उत्कृष्ट चेजर पवन मायण्णावर, अष्टपैलू खेळाडू तानाजी पाटील. मुली : 1) महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर, 2) माऊली हायस्कूल गर्लगुंजी, 3) चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर. उत्कृष्ट रनर गौरी मेलगे, उत्कृष्ट चेजर रसिका कंग्राळकर, अष्टपैलू खेळाडू संजना चिट्ठी. खुला गट कबड्डी ः 1) पिरनवाडी क्लब पिरनवाडी, 2) बेडकिहाळ, 3) हिडकल क्लब. उत्कृष्ट रायडर सचिन शिंदहट्टी, उत्कृष्ट कॅचर रमेश शिंदहट्टी, अष्टपैलू खेळाडू अभी पिरनवाडी.
माध्यमिक मुले कबड्डाr : 1) सरकारी माध्यमिक शाळा कादोळी, 2) संत मीरा, 3) देसूर हायस्कूल. उत्कृष्ट रायडर नागेश अनगोळकर, उत्कृष्ट कॅचर आकाश पाटील, अष्टपैलू खेळाडू गुरुप्रसाद हैबत्ती, मुली ः 1) बालिका आदर्श, 2) हिंडलगा हायस्कूल, 3) शिवाजी हायस्कूल कडोली. बेस्ट कॅचर अश्विनी पाटील, उत्कृष्ट रायडर कीर्ती कडोलकर, अष्टपैलू खेळाडू राधिका डुकरे. प्राथमिक विभाग व्हॉलीबॉल मुली ः 1) बालिका आदर्श अ, 2) बालिका आदर्श, 3) लिटल स्कॉलर स्कूल, मुले ः 1) ब्लूमींग बर्ड स्कूल, 2) भरतेश स्कूल, 3) सरकारी मराठी शाळा बेनकनहळ्ळी. माध्यमिक विभाग थ्रो बॉल मुली ः 1) बालिका आदर्श, 2) मंडोळी हायस्कूल मंडोळी. उत्कृष्ट थ्रोवर सेजल लोहार, बेस्ट कॅचर एकांती पाटील, अष्टपैलू खेळाडू श्रेया पाटील. खुला गट ः 1) बालिका आदर्श, 2) व्हीएम शानभाग स्कूल. उत्कृष्ट थ्रोवर संजना डेळेकर, उत्कृष्ट कॅचर वृषाली सुतार, अष्टपैलू खेळाडू मयुरी पिंगट. माध्यमिक गट व्हॉलीबॉल मुलाr ः 1) बालिका आदर्श अ, 2) बालिका आदर्श ब, 3) डीपी स्कूल बेळगाव. उकृष्ट लिफ्टर वैभवी बुद्रुक, उत्कृष्ट स्मॅशर अपूर्वा नाईक, अष्टपैलू खेळाडू निर्मला गुंजीकर. मुले ः 1) मोरारजी देसाई स्कूल कटकोळ, 2) मलप्रभा हायस्कूल चापगांव, 3) एमव्हीआरएस हायस्कूल. अष्टपैलू खेळाडू भास्कर पाटील, उत्कृष्ट लिफ्टर सदाशिव पाटील, बेस्ट स्मॅशर राजू बंडीवड्डर.
बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाभारती राज्य अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, जिल्हा संयोजक विश्वास पवार, संजीव नाईक, मोहन पत्तार, व्हीएस पाटील, उमेश बेळगुंदकर, विवेक पाटील, नितीन नाईक, सी.आर, पाटील, एलसी लमाणी, वायसी गोरल, एनएन कातकर, आरएल पाटील, नारायण पाटील, परशराम मंगनाईक, शंकर कोलकार, एलबी नाईक, जयसिंग धनाजी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडाभारतीच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम
घेतले.