गौंडवाडच्या दौलत मुतगेकर यांनी मिळवला प्रथम क्रमांक
वार्ताहर / बैलूर
येथील श्री पावणाई देवी ट्रक्टर संघटना बैलूर यांच्यावतीने खुली राऊंड ट्रक्टर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला अमाप प्रतिसाद मिळाला असून त्यात दौलत मुतगेकर (गौंडवाड) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन खानापूर तालुक्याच्या आमदार अंजली निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी लक्ष्मणराव झांजरे, पुंडलिक नाकाडी, विठ्ठल गुरव, कृष्णकांत बिर्जे, पुंडलिक पाटील, कृष्णा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये खानापूर व बेळगाव तालुक्यातून अनेक ट्रक्टर मालकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी नऊ बक्षिसे ठेवण्यात आली होती.
प्रथम क्रमांक दौलत मुतगेकर (गौंडवाड), द्वितीय क्रमांक जय जीनेंद्र (हलगा), तृतीय क्रमांक- नेताजी मुंगले (सावगांव), त्याचबरोबर श्री गणेश प्रसन्न (सोनोली), श्री मंगाई प्रसन्न (बैलूर), एम.एस. एक्केरी (शिंदोगी), सोमनाथ प्रसन्न (सावगांव), कलमेश्वर प्रसन्न (सावगांव) जोतिबा गावडे (बैलूर) यांनी बक्षिसे मिळविली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पांडुरंग गुरव, संजय नाईक, पांडुरंग गावडे, सौरव सावंत, रवळू राजगोळकर, जोतिबा गुरव तसेच संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.