क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त व धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभात जेत्यांना केएससीए अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्या हस्ते गौरवले गेले. यावेळी व्यासपीठावर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष के. अभिराम, सचिव संतोष मेनन, केएससीए मॅनेजिंग डायरेक्टर तिलक नायडू, धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार, धारवाड विभागीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विरण्णा सवदी व अल्ताफ कित्तूर उपस्थित
होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्फातंमय गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले. धारवाड विभागातर्फे रॉजर बिन्नी, के अभिराम, संतोष मेनन व तिलक नायडू यांचा खास गौरव करण्यात आला.
2020 केएससीए पहिल्या लीग स्पर्धेतील एस. जी. एम. धारवाड विजेता, बीडीके हुबळी उपविजेता, बेळगाव स्पोर्ट्स अ तिसरा क्रमांक, हुबळी स्पोर्ट्स क्लब चौथा क्रमांक. सर्वाधिक धावा वैभव संघमित्र युनियन जिमखाना, सर्वाधिक बळी रोहित पाटील आनंद अकादमी बेळगाव यांना रोख रक्कम, चषक देऊन गौरविण्यात आले.
दुसऱया विभागीय स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स ब संघ विजेता, हुबळी स्पोर्ट्स क्लब उपविजेता, स्पोर्ट्स अकॅडमी गदग तिसरा क्रमांक तर टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी चौथा क्रमांक, स्पर्धेतील सर्वाधिक धावा काढणारा व्यंकटेश शिराळकर बेळगाव तर सर्वाधिक बळी घेणारा रवी किरण गिरडी गदग यांचाही गौरव करण्यात आला. केएससीए थर्ड डिव्हीजनमध्ये आनंद अकादमी विजेता, भटकळ स्पोर्ट्स क्लब उपविजेता, केएससीए फोर्थ डिव्हिजनमध्ये तेजल शिरगुप्पी क्रिकेट अकादमी विजेता अर्जुन स्पोर्ट्स क्लब बेळगाव उपविजेता, 14 वर्षाखालील स्पर्धेत बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन हुबळी विजेता, हुबळी क्रिकेट अकादमी उपविजेता. 16 वर्षाखालील स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ विजेता, आनंद क्रिकेट अकादमी उपविजेता. या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, चषक देऊन गौरविण्यात आले. वीरण्णा सवदी यांनी शेवटी आभार मानले.