जान्हवी कपूरनंतर, बोनी कपूर आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरच्या बॉलिवूड डेब्यूची खूप प्रतीक्षा होती. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत तिने एका चित्रपटात काम केल्याची चर्चा तेव्हापासून सुरू झाली होती, जेव्हापासून ते डान्स रिहर्सलसाठी एकत्र दिसले होते. त्यानंतर, खुशी, अगस्त्य आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोबत झोया अख्तरच्या चित्रपटात पदार्पण करतील. यापैकी एकाकडूनही खात्री झालेली नसली तरी, बोनी कपूरने खुशीच्या डेब्यू चित्रपटाबद्दल एक प्रमुख इशारा दिला आहे. अलीकडेच, एका मुलाखतीत बोलताना बोनी म्हणाले, “ती एप्रिलमध्ये तिच्या चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार आहे. सध्या तरी याबाबत अधिक सांगू शकत नाही, तुम्हाला लवकरच याबद्दल अधिक माहिती मिळेल. जान्हवीप्रमाणेच खुशीलाही अभिनयात करिअर करायचे आहे,’’ असे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. या स्टार किडची सोशल मीडियावर आधीच चांगली चर्चा आहे. पण डॅडी बोनी तिला लाँच करणार नसून त्यासाठी ते दुसरा निर्माता शोधत आहेत.
Previous Articleमणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात 80 टक्के मतदान
Next Article दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या मार्गावर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.