वृत्तसंस्था/ पॅरीस
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पॅरीस मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रीयाचा साथीदार ऑलिव्हर माराच यानी दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
पुरूष दुहेरीच्या दुसऱया फेरीतील अटीतटीच्या सामन्यात बोपण्णा आणि माराच यांनी नवव्या मानांकित मार्टिन व रॉजेर यांचा 3-6, 6-4, 10-8 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. आता शुक्रवारी बोपण्णा आणि माराच यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना व्हॅसेलिन व मेलझर यांच्याशी होणार आहे.