ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या देशात आतापर्यंत 1 कोटी 30 हजार 626 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 43 हजार 610 जणांचा मृत्यू झाला आहे.
वर्ल्डोमीटरनुआर, गुरुवारी ब्राझीलमध्ये 51 हजार 350 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1432 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांपैकी 89 लाख 95 हजार 246 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 7 लाख 91 हजार 770 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.