लंडन
युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटनच्या संसदेमध्ये एक संशयित चीनी एजंट कार्यरत असल्याची माहिती उघडकीस आली असून याची दखल प्रशासनाने घेतली आहे, असे समजते. ब्रिटनमधील सुरक्षा व्यवस्थेला याबाबत हायअलर्ट जारी करण्यात आला असून यासंदर्भात तपासाला वेग देण्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. स्पुत्नीक या न्यूज एजन्सीकडून यासंदर्भात माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची माहिती मिळताच संसदेच्या सभापतींनी आपल्या संसदेची व सदस्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याबाबत अग्रक्रम घेतला आहे. लंडनमधील वकील ख्रिश्टीन ली यांचे नाव याप्रकरणी पुढे आले आहे. त्या चीनमधील कम्युनिस्ट पक्षातर्फे लंडनमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. संसद सदस्य आणि इतर राजकीय संबंधित लोकांशी तिने संपर्क साधला असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे.