रामपूरः
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रिजने गुवाहाटीतील आपल्या व्यवसाय कारखान्यात महिलांची संख्या 65 टक्के इतकी करण्याची योजना बनवली आहे. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने यासंबंधीची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. या वर्षी सदरच्या कारखान्यामध्ये महिलांची संख्या 65 टक्के इतकी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आसाममधील कामपूर जिल्हय़ातील रामपूरमध्ये सदरचा कारखाना स्थित आहे.