नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेल यांनी ऍक्सिस बँकेसोबत आर्थिक व्यवहारांची सेवा देण्यासाठी भागीदारी केली आहे. भारती एअरटेलने यासंबंधीची माहिती नुकतीच दिली आहे. दूरसंचार सेवा कंपनीकडून ग्राहकांना लवकरच को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे आता खरेदी करा, मग नंतर पैसे भरा, अशीही योजना आणली जाणार असल्याचे समजते. टायर 2 व टायर 3 शहरात आपल्या सेवेचा विस्तार करण्यासाठी भारती एअरटेलला ऍक्सिस बँकेची मदत होणार आहे.