विक्रांत मैसी अलिकडेच प्रदर्शित झालेला ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटामुळे तर नोरा फतेही ‘भुज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. विक्रांत आणि नोरा आता निर्माते नीरज कोठारी यांचा आगामी चित्रपट ‘ब्लॅकआउट’मध्ये एकत्र दिसून येणार असल्याचे वृत्त आहे. विक्रांतने ‘ब्लॅकआउट’मध्ये काम करण्यासाठी होकार दर्शविला आहे. या चित्रपटात विक्रांतची नायिका म्हणून नोराची निवड करण्यात आल्याचे समजते.
नोव्हेंबर महिन्यात विक्रांत आणि नोरा या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहेत. हा एक थ्रिलर-ड्रामा चित्रपट असून याचे दिग्दर्शन देवांग भावसार करणार आहेत. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. नीरज आणि सरिता तंवर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.