क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कडोली ग्राम पंचायतीतर्फे कराटे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूंचा खास गौरव करण्यात आला.
डायनॅमिक शुटोकॉन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे ब्लॅक बेल्ट परीक्षा ठेवण्यात आली होती. कराटे मास्टर नागेश पाटील व सेन्सी सुकन्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेपटूंनी परीक्षा दिली होती. श्रेया मायण्णा, रश्मी पाटील, भावेश्वरी गौंडाडकर, भावना गौंडाडकर या कराटेपटूंनी या परीक्षेत भाग घेऊन ब्लॅकबेल्ट मिळविला. त्याबद्दल कडोली ग्रा. पं. अध्यक्षा श्रीदेवी पाटील व सदस्यांनी वरील सर्व मुलींचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.