गणेश हुक्केरी यांचे प्रतिपादन : माजी सैनिक संघटनेच्या भवनाचे उद्घाटन
वार्ताहर / पट्टणकुडी
जीविताची जोखीम पत्करून आपल्या देशवासियांच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱया सैनिक, माजी सैनिकांप्रती सर्व नागरिकांनी नेहमीच कृतज्ञ राहिले पाहिजे. सैनिकांच्या कार्याची महती लक्षात घेऊन त्यांना प्रथम प्राधान्याने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजे. त्यामुळे सैन्यदलामध्ये भरती होऊ इच्छिणाऱया तरुणांसाठी त्यांच्या पूर्व तयारीसाठी, प्रशिक्षणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. वाळकी येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या समुदाय भवनाच्या उद्घटनाप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी आमदार गणेश हुक्केरी, संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामासाठी माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला होता. यावेळी गणेश हुक्केरी यांच्या हस्ते ज्येष्ठ माजी सैनिक मारुती नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास युवा नेते सुजय पाटील, संघटनेचे उपाध्यक्ष यशवंत पाटील, नेमगोंडा पाटील, परसू नाईक, पट्टणकुडी ग्राम पंचायत सदस्य विद्याधर कागे, विठ्ठल एकणे, बबन नाईक, सुधीर खोत, काकासाहेब पाटील, रावसाहेब डोणे, लक्ष्मण सूर्यवंशी, विनोद कोकणे, राजू सिद्धण्णावर, ज्ञानदेव कुंभार, दिलीप लाटकर, अर्जुन पाटील, अण्णासाहेब नाईक, प्रकाश पाटील, महांतेश चौगुले यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यशवंत पाटील यांनी स्वागत करून आभार मानले.