प्रतिनिधी / पणजी
सरकारने राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा दिला असून एकूण 18.3 कोटींची सवलत आता ग्राहकांना मिळणार आहे. एप्रिल-मे महिन्यातील वीज बिलांचे ठरलेले शुल्क (फिक्स चार्जेस) 50 टक्के माफ करण्यात येणार आहे. ती सवलत सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना दिली जाणार आहे. सदर सवलत आगामी वीज बिलांमध्ये तडजोड करून मिळणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
वीजबिलांची रक्कम माफ करावी अशी मागणी घेऊन काँग्रेसतर्फे अलिकडेच आंदोलन करण्यात आले होते. तसे बिल माफ करता येणार नाही, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी म्हटले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी वीज बिलात सवलत देणार असल्याचे स्पष्ट केले.