प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरातील लसीकरण केंद्र बंद असल्या प्रकरणी आमदार योगेश कदम यांना एका व्यक्तीने फोन केला म्हणून त्या आमदारांनी फोन का लावता? असे म्हणून भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीराम उर्फ भाऊ ईदाते यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक मंगेश राजपूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. आता याला सेना स्टाईलने कसे प्रत्युत्तर देण्यात येते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत श्रीराम ईदाते यांच्याशी संपर्क साधला असता आपण कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केली नसल्याचा खुलासा त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केला.