पणजी प्रतिनिधी
फुलपाखरु या सौंदर्ययुक्त गोजिरवाण्या कीटका मधील एक प्रजातीला राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा मिळावा, या शुद्ध हेतूने, भारतातील फुलपाखरूप्रेमी लॉकडाउनच्या काळात एकत्र आले. या सर्व फुलपाखरू अभ्यासक,शास्त्रज्ञ ,संशोधक व फुलपाखरू प्रेमींनी एकत्र येऊन भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू ठरवण्यासाठी प्रयत्न सुरु केला असून लोकांनी त्यासाठी आपली मते नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक निकषांचा विचार करून फुलपाखरू अभ्यासकांकडून फुलपाखरे सुचविण्यास सांगितले गेले. त्याप्रमाणे सुमारे पन्नास फुलपाखरांची प्राथमिक यादी तयार झाली. या 50 प्रजातींच्या फुलपाखरांमधून, लोकशाहीपद्धतीने ( प्रथम पसंती, द्वितीय पसंती, तृतीय पसंती या प्रमाणे ) चाचपणी करून , एकूण सात फुलपाखरांच्या प्रजातींची अंतिम निवड करण्यात आली. त्यांची नावे पुढील प्रमाणे 1) कृष्णा पिकॉक 2) कॉमन जेझबेल 3) ऑरेंज ओक्लिफ 4) फाईव्हबार स्वर्डटेल , 5) कॉमन नवाब 6) यल्लो गॉरगॉन 7) नॉर्थन जंगल क्वीन
या फुलपाखरांच्या सात प्रजाती मधून भारतीय नागरिकांना दिनांक 11 सप्टेंबर 2020 ते 7 ऑक्टोबर 2020 या एका महीन्यांच्या कालावधीत , अत्यंत सोप्या पद्धतीने (गुगल फॉर्म मार्फत) आपले बहुमूल्य मत नोंदवायचे आहे.
या लिंक द्वारे आपले मत नोंदवून , सामान्य जनतेने आपले आवडते फुलपाखरू निवडावे हि कळकळीची विनंती फुलपाखरू अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांनी केली आहे.