वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या कनि÷ांच्या विश्व मानांकन बॅडमिंटनपटूंच्या यादीत भारताच्या सहा बॅडमिंटनपटूंनी पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे.
भारताचा कनि÷ बॅडमिंटनपटू वरुण कपूर आणि सामिया इमाद फारुकी यांचा यामध्ये समावेश आहे. पुरुष बॅडमिंटनपटूंच्या एकेरीच्या मानांकनात भारताच्या वरुण कपूरच्या मानांकनात चार अंकांनी सुधारणा झाली. आता तो दुसऱया स्थानावर आहे. त्याचप्रमाणे सामिया इमाद फारुकीने महिला एकेरीच्या मानांकनात दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. तिचे मानांकन सहा अंकांनी वधारले आहे. गेल्या वषी वरुण कपूरने सहाव्यांदा कनि÷ गटातील विजेतेपद मिळविले होते. सदर स्पर्धा गेल्या वषी नोव्हेंबरमध्ये खेळविण्यात आली होती. हैद्राबादच्या सामियाने 15 वर्षांखालील वयोगटाची आशियाई बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. पुरुष आणि महिला एकेरीच्या पहिल्या 20 बॅडमिंटनपटूंमध्ये भारताच्या 10 बॅडमिंटनपटूंचा समावेश आहे. महिला कनि÷ एकेरीच्या मानांकन यादीत भारताच्या तस्नीम मिरने चौथे, टेसा जॉलीने आठवे आणि आदिती भटने दहावे स्थान मिळविले आहे. कनि÷ महिलांच्या दुहेरीच्या मानांकनात टेसा आठव्या, तनिशा पेस्टो नवव्या स्थानावर आहे.