- गेल्या 24 तासात 86,821 नवे रुग्ण; 1,181 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 86 हजार 821 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1,181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 63 लाख 12 हजार 585 वर पोहचली असून, मृतांची संख्या 98 हजार 678 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 40 हजार 705 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 52 लाख 73 हजार 202 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 7 कोटी 56 लाख 19 हजार 781 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 लाख 23 हजार 052 रुग्णांची तपासणी बुधवारी एका दिवसात करण्यात आली.