मार्च तिमाहीतील आकडेवारीचा समावेश ः विक्रीत लेनोवो आघाडीवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय बाजारात टॅब्लेटची विक्री मार्च 2022 मध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत वर्षाच्या आधारे 68 टक्क्यांनी वाढली आहे. टॅब्लेट बाजारात लेनोवो सर्वात पुढे आहे. सायबरमीडिया रिचर्स (सीएमआर) ने ही माहिती आपल्या अहवालामधून दिली आहे. प्राप्त अहवालानुसार 2022 मध्ये देशातील टॅब्लेट विक्री ही 10ते 12 टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही मांडली आहे.
तिमाहीच्या आधारे 4 जी टॅब्लेटची विक्री ही 74 टक्क्यांनी वाढली आहे. सीएमआरच्या विश्लेषकांच्या मतानुसार उद्योग समूहाचे मेनका कुमार यांनी म्हटले आहे, की ‘शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील भारतामध्ये समग्र टॅब्लेट बाजारात तेजी आली असल्याचेही सांगितले आहे.’ दरम्यान यामध्ये आठ इंच डिस्प्ले असणाऱया टॅब्लेटची विक्री भारतीय बाजारात एकूण विक्री 26 टक्के आहे, तर 10 इंच आणि त्यापेक्षाही अधिक डिस्प्ले असणाऱया टॅब्लेटचा एकूण विक्रीत 61 टक्के हिस्सा राहिला आहे.
लेनोवो अव्वल स्थानी
लेनोवोने या क्षेत्रात आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. यामध्ये मुख्य स्वरुपात 7,000 ते 25,000रुपयाच्या श्रेणीमध्ये लेनोवा टॅब एम8(एचडी)वायफायसह 4जी, 2जीबी व 32 जीबी श्रेणीतील बाजारातील हिस्सेदारी 32 टक्के राहिली आहे. तर पहिल्या तिमाहीत कंपनीची विक्री ही साधारणपणे 48 टक्क्यांनी वधारली आहे. मार्च 2022 मधील जानेवारी ते मार्च तिमाहीत ऍपल व सॅमसंग कंपनीने 22 टक्के बाजारात हिस्सेदारी प्राप्त केली असून त्या पाठोपाठ रियलमी व लाव्हा यांचा नंबर लागतो.