ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी 11 हजार 929 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 311 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 3 लाख 20 हजार 922 वर पोहचली असून, मृतांची संख्या 9195 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 49 हजार 348 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 62 हजार 379 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 1 लाख 04 हजार 568 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 38 हजार 958, तामिळनाडूत 42 हजार 687, गुजरातमध्ये 23 हजार 068, मध्यप्रदेश 10 हजार 641, आंध्र प्रदेश 5965, बिहार 6290, राजस्थान 12 हजार 401, उत्तरप्रदेश 13 हजार 118 तर पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 698 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.