वर्ल्ड बँकेचे अनुमान : अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ल्ड बँकेने कोरोनाच्या वाढल्या संकटासोबत जगावरील वाढत जाणारी विविध टप्यांवरील आर्थिक समस्या व उपाय यांचे अनुमान देण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून पाळणत येत आहे. सध्या बँकेकडून भारतासोबत दक्षिण आशियातील देशांच्या आर्थिक विकासावर होणाऱया परिणामांची मांडणी केली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृध्दीचा दर 1.8 ते 2.8 टक्यांवर खाली येण्याचे अनुमान मांडले आहे यात भारताची अर्थव्यवस्था या विभागातील अन्य देशाच्या तुलनेत सर्वात मोठी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासात मोठी घसरण होण्याचे अनुमान नोंदवले आहे.
देशाचा अहवाल मांडताना 31 मार्च 2020 रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्ष 2011-20 साठी 4.8 ते 5 टक्यांनी आर्थिक वृद्धी होण्याचे होण्याचे अनुमान व्यक्त केले आहे. थ्सेच 2014 च्या शेवटपर्यंत नोंदवण्यात आलेल्या चांगल्या कामगिरी आलेख कोरोनाच्या संकटामुळे समाप्त झाला असल्याचेही सांगितले आहे.
अन्य देशांना फटका
कोरोनाच्या महामारीमुळे श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश यांच्या आर्थिक विकासात वेगाने घसरण होणार आहे. तर दुसऱया बाजूला पाकिस्तान, अफगाणिस्थान आणि मालदीवांची अर्थव्यवस्था तर मंदीचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.हा अहवाल सदरच्यादेशांचा 7 एप्रिलपर्यंतचा डाटा हा अहवाल तयार करण्यासाठी वापरण्यात आला आहे. कोरोना विषाणुंचा वाढता विळखा येत्या काळात आणखीन घट्ट होण्याची भीती असल्याने योग्य तो पर्यायी मार्ग आर्थिक क्षेत्रासाठी निर्माण करावे लागणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
बँका-सरकारसाठी नवीन उपाय
कोरोनाचा फटका जगातील अतिप्रगत देशांनाही बसत आहे. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी प्रत्येक देशांच्या बँका आणि सरकार नवीन पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये मजूर एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी काम करणाऱया समूहासाठी सरकारने आर्थिक सहाय़ देण्याची घोषणा केली आहे. वैयक्तिक कर्जासोबत अन्य आर्थिक सवलती देण्याचा प्रयत्न सरकार व बँका हे करीत आहेत. सध्या सरकारने लॉकडाऊनमुळे प्रभावीत झालेल्या लोकांसाठी 1.7 लाख कोटी रूपयांची आर्थिक घोषणा केली आहे. शेजारचा देश पाकिस्तानने अर्थव्यवस्थेला चालना देण्यास 45 हजार कोटीचे आर्थिकस सहाय्य दिले आहे, असे विविध देश पर्यायी मार्गांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.