नवी दिल्ली
जगभरासह देशातील आर्थिक क्षेत्राचा समतोल काही प्रमाणात सावरत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे विविध रेटींग्स आणि अंदाज मांडणाऱया संस्थांकडून या विकासदराच्या अंदाजामध्ये फरक दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये सध्या आशियाई विकास बँक यांच्या आऊटलूक या अहवालानुसार वर्ष 2020 मध्ये चीनमधील आर्थिक सुधारणा वेगाने होत असल्याचे नोंदवले आहे. तसेच 2020 मधील विकसनशील आशियाई देशांचा जीडीपी हा काही प्रमाणात घसरणीत राहणार असून तो पहिल्यासारखा खूप मोठय़ा प्रमाणात घसरणीत राहणार नसल्याचे एडीबीने मत नोंदवले आहे.
सदर अहवालात भारताचा जीडीपी दर हा 2021 मध्ये तेजी प्राप्त करण्यासह 8.0 टक्क्यांवर पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज 2020 साठी 0 ते 8.0 टक्क्यांच्या खाली राहणार असल्याची माहिती आहे. दुसऱया बाजूला विकसनशील आशियाई देशांची आर्थिक तेजी ही 0.7 टक्क्यांनी उणे राहणार असल्याची माहिती आहे.
आशिया-प्रशांत क्षेत्रासाठी दर
एडीबीने आपल्या आऊटलूक या अहवालात दिलेल्या निरीक्षणानुसार आशिया आणि प्रशांत क्षेत्रात जवळपास 45 देशांच्या समूहाचा समावेश होतो. यामध्ये विकसनशील देशांचा आर्थिक विकासदर हा चालू वर्षात 0 ते 0.4 टक्क्यांच्या खाली राहणार असल्याचे संकेत आहेत. या अगोदरच हा अंदाजदर 0 ते 07 टक्क्यांच्या खाली राहणार असल्याचा अंदाज एडीबीने व्यक्त केला होता.
कोरोना संकटाचा प्रभाव राहणार
कोरोनाचा प्रभाव हा आगामी काळातही काही प्रमाणात राहणार असल्याचे संकेत असून सध्या कोरोना लसीच्या संदर्भात येणाऱया बातम्यांमुळे ही भीती काही प्रमाणात कमी होत असून याचा लाभ मंदावलेले आर्थिक क्षेत्र सुधाण्यास मदत मिळण्याचे संकेत प्राप्त होणार असल्याचे एडीबीचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ यासूयुकी सवादा यांनी स्पष्ट केले आहे.