12 डिसेंबर रोजी राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी शुक्रवारी दिल्लीत पोहोचणार आहेत. तत्पूर्वी सुशील मोदी यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे मोदी यांना शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता राज्यसभा सदस्यत्वाची शपथ देणार आहेत.
सुशील मोदी यांना केंद्रात मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा आहे. जीएसटी परिषदेचे अध्यक्ष राहिलेल्या सुशील मोदी यांना अत्यंत महत्त्वाचे खाते देण्यात येऊ शकते. मोदी हे 2005 ते 2013 पर्यंत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिले आहेत. 2017-2020 पर्यंतही ते याच पदांवर कार्यरत होते.