तालिबानींसोबतच्या संघर्षावेळी घात, रॉयटर्स’साठी फोटो जर्नलिस्ट म्हणून कार्यरत-‘पुलित्झर’ पुरस्काराने झाला होता गौरव
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानमधील कंधार प्रांतात सुरू असलेल्या संघर्षाचे कव्हरेज करण्यासाठी तेथे गेलेल्या भारतीय ‘पुलित्झर’ पुरस्कार विजेत्या पत्रकाराची (फोटो जर्नलिस्ट) निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दिकी असे या पत्रकाराचे नाव आहे. कंधारमधील स्पिन बोल्डन भागात हिंसाचार कव्हर करताना त्यांची गोळय़ा घालून निर्घृण हत्या करण्यात आली. अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममूंदजे यांनी याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत पुलित्झर पुरस्कार विजेत्या दानिश सिद्दिकीला श्रद्धांजली वाहिली. तसेच सिद्दिकी यांनी कॅमेराबद्ध केलेला एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
सिद्दिकी यांची गणना जगातील सर्वोत्कृष्ट फोटोग्राफरमध्ये होत होती. ते सध्या आंतरराष्ट्रीय संस्था ‘रॉयटर्स’साठी काम करत होते. अफगाणिस्तानमध्ये उसळलेला हिंसाचार कव्हर करण्यासाठी ते येथे गेले होते. अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. तालिबानने अनेक मोक्मयाची ठिकाणे ताब्यात घेतली असून येथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. दानिश सिद्दिकी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर नुकतेच अफगाणिस्तानमधील काही फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले होते. बेभान झालेल्या गर्दीने त्यांच्या ताफ्यावरही हल्ला केला होता आणि याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला होता.
अफगाण स्पेशल फोर्ससोबत राहून फोटो जर्नलिस्ट सिद्दिकी आपली डय़ुटी बजावत होते. दहशतवाद्यांनी अफगाण स्पेशल फोर्सच्या तुकडीवर हल्ला केल्यामुळे त्यांना प्राणास मुकावे लागले. तालिबानच्या हिंसक कारवाया जगापुढे आणण्यासाठी फोटोग्राफी करत असतानाच त्यांची हत्या झाली आहे. याआधी 13 जून 2021 रोजी तालिबानने केलेल्या एका हल्ल्यातून ते थोडक्मयात बचावले होते.
मूळचे मुंबईतील, सध्या दिल्लीत वास्तव्य
40 वर्षीय दानिश सिद्दिकी मूळचे मुंबई येथील आहेत. सध्या ते रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या दिल्ली ब्युरोतील मुख्य फोटो जर्नलिस्ट होते. त्यांनी कोरोनासह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटनांचे कव्हरेज केले होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी काम करताना त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना पुलित्झर पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले होते. तसेच त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून 2007 मध्ये मास कम्युनिकेशनचे शिक्षणही पूर्ण केले होते.