वृत्तसंस्था/ हैद्राबाद
इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया हैदराबाद एफसी संघाने ब्राझिलियन फुटबॉलपटू जोआव व्हिक्टरबरोबरचा करार आणखी दोन वर्षांसाठी वाढवला आहे.
32 वर्षीय व्हिक्टर याचा याआधीही हैदराबाद संघात समावेश होता. आता त्याच्या करारामध्ये दोन वर्षांची वाढ करण्याचा निर्णय या संघाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी घेतला आहे. 2019-20 च्या इंडियन सुपर लिग हंगामात हैदराबाद एफसी संघाने बऱयापैकी कामगिरी केली. मात्र या संघाला पहिल्या चार संघात स्थान मिळविता आले नाही. 2020 च्या ऑगस्टमध्ये व्हिक्टर हैदराबाद संघात पहिल्यांदा दाखल झाला होता. हैदराबाद एफसीने व्हिक्टरबरोबर आता 2023 सालापर्यंत करार केला आहे.