प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने सदाशिवनगर (बुद्धभूमी) येथील बुद्धविहार येथे भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला हार अर्पण करण्यात आला. गौतम बुद्ध यांच्या पुतळय़ाला हार अर्पण करून बुद्धवंदना म्हणण्यात आली.
त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य एस. आर. शिंदे, सुधाकर बौद्ध, प्रा. के. डी. मंत्रेशी, दीपक मेत्री, किरण पाटणकर, जीवन कुरणे, अनिल अळगुडकर, के. एम. चौगुले, बाळू सुंठकर, वाय. पी. गडीनायक, रमेश कांबळे, सोनाली कांबळे आदी उपस्थित होते.