प्रतिनिधी / बेळगाव
आदर्शनगर-वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाळ बिर्जे यांनी आपल्या स्वर्गीय नरेंद्र या मुलाच्या वाढदिवसानिमित्त 15 कुटुंबांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. पटवर्धन लेआऊटमधील गोपाळ बिर्जे सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये 15 गरीब महिलांना साखर, गूळ, पोहे, रवा, तूरडाळ, साबण, पीठ, मीठ, तेलाची पाकिटे असे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गोपाळ बिर्जे यांनी उपस्थितांचे स्वागत करून उद्देश स्पष्ट केला. अनंत लाड, नेताजी जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी वर्षा बिर्जे, वनिता बिर्जे यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले. जयदीप बिर्जे यांनी आभार मानले.